सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा नवा दर
खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या दरात अनेक वेळा चढ-उतार झाला. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजाराच्यावर गेला आहे.
गुरुवारी पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोबतच चांदीही महागली आहे.आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ५८० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २९० रुपयाने तर चांदी ६७० रुपयाची घसरण झाली होती.
जवळपास या युद्धाला एक महिना होत आला आहे. गेले काही दिवस सोन्या-चांदीचे दर अस्थिर पाहायला मिळत आहेत.अजून लगीनसराई सुरू झालेली नाही. गुढीपाडवाही लांब आहे. त्यामुळे तूर्तास बाजारात सोन्याला म्हणावी तशी मागणी नाही. येणाऱ्या काळात सराफातील गर्दी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या साधारणतः दोनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे.
मुंबई 47,750
पुणे 47,820
नाशिक 47,650
नागपूर 47,800
दिल्ली 47,450
कोलकाता 47,560
चेन्नई 47,830
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम