सरस्वती नगरात संजय भास्कर पाटिलांनी केली पाणपोई ची सोय

खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | सध्या उन्हाळा सुरू झालेला असुन कडक ऊन्हात नागरिकांना थंड पाणी करता. सरस्वती नगर येथील कमल पॅराडाईज हॉल जवळ संजय भास्कर पाटिल यांच्यातर्फे पाणपोई टाकण्यात आलेली आहे.
सदर पाणपोईचा शुभारंभ जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते फित कापुन व प्रमिलाताईंचे भाऊ अशोक कोल्हे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. प्रमिलाताई भास्कर पाटिल व भास्कर भगवान पाटिल यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र संजय भास्कर पाटिल यांनी नागरिकांना थंड पाणी करता. तहान भागविण्यासाठी या पाणपोईत दोन वॉटर कुलर बसविण्यात आले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक व जवळच असणाऱ्या हायवेहुन येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना देखील थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रमिलाताई पाटिल या सेवाभावी वृत्तीच्या असुन त्यांचे भाचे अमोल कोल्हे यांनी सुरू केलेल्या पाणपोईत अनेक वर्षे सुरू ठेवली. प्रमिलाताई पाटिल स्वतः रांजण धूऊन त्यामध्ये पाणी भरत व वाटसरूंना पाणी वाटुन सेवा करत असत. हा वारसा पुढे चालवत संजय पाटिल यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली आहे. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक भारत कोळी, मनपाचे अभियंता जितेंद्र रंधे, आशीर्वाद मोटर्सचे संचालक गुणवंतशेठ झोपे, चैतन्य कोल्हे, ललित चौधरी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती सर्व उपस्थितांनी संजय पाटिल यांच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम