गज़ाला तबस्सुम फातिमा शेख यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरवण्यात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना जळगाव’तर्फे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेत कार्य करणारे उत्कृष्ट व गुणवंत शिक्षक, शिक्षिका यांना रविंद्र पाटील, चेअरमन ज.जि. मा. बैंक जळगाव यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमात पुष्पगुच्छ, शाल व ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गज़ाला तबस्सुम यांना फातिमा शेख गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.

यशवंतराव चव्हाण गुणवंत पुरस्कार, बहिणाबाई गुणवंत शिक्षक पुरस्कार, फातिमा शेख गुणवंत शिक्षक पुरस्काराने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय जळगाव येथे जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर प्रमुख पाहुणे माजी आ.दिलीप वाघ, संजय गरुड, सुनिल पाटील, सलीम इनामदार, अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, विलास नेरकर, मगन व्यंकट, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक गौरव पुरस्कार गैवर कार्यक्रमात उर्दू शिक्षक प्रतिनिधी म्हणून गज़ाला तबस्सुम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. . प्रत्येक शिक्षकाचे उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने व सामाजिक संस्थांनी मान सन्मान देऊन कौतुक केले. कौतुकाची शाबासकी मिळाल्यानंतर पुन्हा जोमाने ते आपले शैक्षणिक कार्य करतात व देशहितासाठी मुलांना मध्ये गुण रुजवतात. उर्दू शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान असून सर्व उर्दू शिक्षक मंडळाला पुरस्कार समर्पित केला.

मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गज़ाला तबस्सुम यांना पुरस्कार मिळाले बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत. कुऊबा संचालक असगर, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पत्रकार दिपक नगरे, पो. नि. कैलास नागरे रावेर, पो.नि. रामदास वाकोडे जळगांव, डॉ.संदिप पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, समाज सेवक हुस्नोद्दिन शेख, निवृत्त मुख्याध्यापक सैय्यद असगरअली जनाब, जियाउद्दिन शेख, प्रा. शादाब खान, साजीद इकबाल सर फैजपूर नासीर चिनावल, ईम्तीयाज जनाब मारुळ, सैय्यद आसीफ वलीमियाॅ मारुळ आदींनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like