आजचे राशिभविष्य, पहा कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | मेष: व्यय रवि आणि बुध, कायद्याचे पालन करा असं सांगत आहेत. भाग्यकारक चंद्र आर्थिक लाभ घडवेल. मंगळ शुक्र शनी दशमात आहेत.

वृषभ : अष्टम चंद्र तुम्हाला मानसिक ताण देईल. स्वतः वर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

मिथुन : राशीच्या सप्तम स्थानात चंद्र आर्थिक आणि मानसिक ताण दूर करेल. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल.

कर्क : आज दिवस कुटुंबीयांसोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल.

सिंह : पंचम चंद्र शैक्षणिक क्षेत्रात खूप घडामोडी घडवेल. तुम्ही केंद्रस्थानी असाल. संततीची काही चिंता असेल तर ती आता दूर होईल.

कन्या : आज दिवस भाग्य घेऊन येईल. मात्र थोडी हुरहूर मनात राहिल. घरामध्ये काही नवीन सजावट कराल.

तूळ : आज दिवस मानसिक ताण, प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. भावंडांचे सुख मिळेल. लाभ होतील.

वृश्चिक : आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल.
वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

धनु : आज राशी स्थानात चंद्र कुटुंबात आनंद निर्माण करेल.आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत.

मकर : आजचा दिवस हा घर आणि संतती यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल .शैक्षणिक बाजू ठीक राहील.

कुंभ : व्यय मंगळ शनि घरात काही विचित्र अनुभव देतील. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.

मीन: आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like