क्रिश4 लवकरच तुमच्या भेटीला, राकेश रोशन आणि रितिक रोशन शूटिंगमध्ये व्यस्त
खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या सैफ अली खानसोबत आगामी विक्रम वेधाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचवेळी राकेश रोशन यांनी क्रिश फ्रँचायझीच्या सीक्वलचाही प्लॅन केला आहे. राकेश रोशनने आधीच क्रिशसाठी प्लॅनिंग सुरु केले होते.
हृतिक रोशनने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘क्रिश’ मालिकेमुळे त्याची देशभरात सुपरहिरो म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या कास्टिंगचे काम वेगाने सुरु केले आहे. क्रिश 4 ची तयारी आणि चित्रपटाचे कास्टिंग या वर्षी जूनमध्ये सुरु होईल.
या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे राकेश रोशन यांनी अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जातेय. हृतिक ‘विक्रम वेधा’च्या शूटिंगनंतर ‘फायटर’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काम करत आहे. हृतिक साऊथच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. तसेच या आधी कोई मिल गया (2003), क्रिश (2006) आणि क्रिश 3 (2013) या मालिकेतला ‘क्रिश 4’ हा चौथा भाग असेल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम