एक दिवसाचा दिलासा, तर आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका
खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | देशातील पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर जी भीती व्यक्त केली जात होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.ग्राहकांच्या तसेच वाहन चालकांच्या खिशाला अतिरिक्त भुर्दड बसणार आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत प्रत्येकी ८३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. चार दिवसांत पेट्रोल-डिझेल तिसऱ्यांदा महागले आहे. दरवाढ पाहता आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११३ रुपयांवर गेली आहे. तर डिझेल ९६ रुपयांवर गेले आहे.
शुक्रवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली आहे. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २.४० रुपयांची वाढ झाली आहे.
२२ मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये १३७ दिवसांनी करण्यात आली होती. त्यानंतर कालचा दिवस वगळला तर चार दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.
मुंबई ११२.५१/ ९६.७०
दिल्ली ९७.८१/ ८९.०७
चेन्नई १०३.६७/ ९३.७१
बंगळुरु १०३.११/ ८७.३७
कोलकता १०७.१८ / ९२.२२
भोपाळ १०९.८५ / ९३.३५
रांची १००.९६/ ९४.०८
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम