सोने चांदीच्या दरात चढ-उतार , गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लवकर करा खरेदी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या दरात उतार चढ चालू आहे. भारतीय सराफा बाजारात,आज व्यापार दिवशी सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत.

दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यामुळे सोने तेजीत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,९८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,८६० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

आता गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने चांदी खरेदी करण्याची हौस सर्वांना असते. सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजाराच्यावर गेला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ आणि कमकुवत साठा यामुळे सोन्या-चांदीच्या किमती किरकोळ वाढल्या. रशिया-युक्रेन युद्ध चालू आहे परंतु अलीकडे बाजाराच्या दृष्टीकोनातून फारसा बदल झालेला नाही. मुंबई – ४७,९५० / ५२.३१०
दिल्ली – ४७,९५० / ५२,९५०
पुणे ४८,०५० / ५२,३५०

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like