250 आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी
खान्देश लाईव्ह | 06 जुलै 2022 | जळगाव येथील आयएमए, लोकसेवक प्रतिष्ठान व आयएससीसीएम यांच्या संयुक्त विद्यमाने पाल जवळील गारखेडा गावातील 250 आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व औषधी वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत ३ जुलै रोजी झालेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयएमए जळगावचे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे, लोकसेवक प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर बढे, चंदन कोल्हे, आयएससीसीएमचे अध्यक्ष डॉ. राजेश डाबी, सचिव डॉ. रविंद्र पाटील, डॉ. योगिता हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधान सभेचे माजी सभापती स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील आदिवासी स्त्री, पुरुष, लहान मुले यांची 50 जेष्ठ व तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम