रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढ तर सोन्या-चांदीचे दरात मोठी वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या मुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता. यामुळे जागतिक बाजार पेठेत हाहाकार माजली आहे. याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १९३५ डॉलरच्या पुढे गेला आहे.रशियाने युक्रेनच्या तणावामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देत आहे. जळगाव सराफ बाजार पेठेतमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात २५० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी कालच्या सत्रात सोने २६० रुपयांनी तर चांदी ७७० रुपयांनी किमंत वाढली होते.

भारतात सोन्याच्या किमतीने गुरुवारी ५१ हजारांचा टप्पा पार केला. शुद्ध सोन्याचा दर काल बुधवारी ५० हजारांवर जाऊन बंद झाला होता. आज सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने, चांदीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देखील सोने चांदीच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. तर रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे.

सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशिया व युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असल्याने गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like