रशियामधील युद्धाचा कच्च्या तेलाच्या किमतीला बसला फटका

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत भडका उडाला आहे. मागील सात वर्षांतील हा उच्चांकी भाव आहे. दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.

आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मुंबईत आज २४ फेब्रुवारी रोजी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.

एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.
रशियाच्या आक्रमणामुळे त्याच्या तेल उद्योगावर निर्बंध लादले जातील, ज्यामुळे बाजारातील पुरवठा आणखी कमी होऊ शकतो.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like