वाहतूक कोंडीमुळे पालिकेकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात
खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | जळगाव येथील शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून, वाहतूकीला अडचण ठरणारे अतिक्रमणासोबतच पक्के अतिक्रमण सुध्दा काढण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुसावळ शहरातील वर्दळीच्या सर्वच भागातील अतिक्रमण काढण्यास गुरुवार, 24 रोजी सकाळी 10 पासून सुरूवात करण्यात आली.
यावल रोड, जळगाव रोड, जामनेर रोड, खडका रोड, जाम मोहल्ला, वरणगाव रोड या मार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळा ते जळगाव रस्त्यावरील वाय पॉईंटपर्यंत सकाळी अतिक्रमण हटवण्यात आले. तर त्यानंतर गांधी पुतळा ते डी.एस.ग्राऊंड तसेच नवजीवन फर्निचर मॉल ते नाहाटा व रजा टॉवर ते खडका रोड भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील सुमारे 300 पेक्षा अधीक अतिक्रमण धारकांना पालिकेच्या माध्यमातून नोटिसा बजाविण्यात आल्या आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे अडचणी किंवा गदारोळ होऊ नये यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्तात तैनात करण्यात आले. पालिकेच्या सुमारे 70 कर्मचारी व ठेकेदारीच्या कामावरील 30 मिळून शंभर कर्मचार्यांच्या सहभागाने हटवण्यात येत आहे. त्यानंतर उर्वरीत भागातील अतिक्रमण पुढील दोन दिवसात हटवण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन केले आहे.
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण काढण्यावर भर दिला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेकडून 100 कर्मचारी व मजूरांचा ताफा तयार असून त्याच्या माध्यमातून काम चालू आहे. तर कामाला दोन जेसीबी मशीन व सात ट्रॅक्टर राहणार आहे. या माध्यमातून अतिक्रमणावर हतोडा पडत आहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे यावेळी उपस्थित आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम