अमळनेर येथे पार पडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | अमळनेर येथे शेगांव निवासी श्री.साई गजानन परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा बुधवार रोजी साजरा केला. साई गजानन परिवारातर्फे हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण करण्यात आले. दरम्यान, जि.प.सदस्या जयश्री यांनी भेट दिली. गजानन परिवारचे अध्यक्ष पाटील व विठ्ठल पाटील यांनी जयश्री यांचे सत्कार केला. तसेच माजी नगर सेवक विनोद कदम, समाज सेवक दीपक पाटील, प्रवीण दत्तात्रेय सनेर, संदीप पाटील व रंजना देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.

पालखी ऍड. गजानन विन्चुरकर यांच्या घरी पुजा होऊन सुरेश पाटील यांच्याकडून देशमुखाकडे महाआरती करण्यात आली.योगेश मुकुंद बाग यांच्या निवासस्थानी माऊलीची आरती करून भेट करण्यात आली. वाद्यच्या गजरात पालखी मिरवणूक डहाले’च्या घरुन निघाली. बहुसंख्य गजानन भक्त टाळ, मुरूदुंग, वाद्य वाजात मिरवणूकीत सहभागी झाले. त्यानंतर कचेरी समोरून पालखी मिरवणूक गजानन हॉलला नेण्यात आली. सकाळी 11 वाजता सत्संग कार्यक्रमास सड़ावन, चाकवे, नेरपाट येथील गजानन भक्तानी सत्संगात गजानन महाराजांचे भजने, गवळणी, गायन करण्यात आले. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडलाचे शिवाजी पाटील, गुणवंत पवार, एस सोनवणे, ए पाटील , मुकेश सालुंखे, सुनील मुंडले, निळ दादा, राजेंद्रसिंग पाटील, सुनीता पाटील, ललिता पाटील,चंद्रशेखर वैद्य, छाया इसे , राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, योगिता डहाळे, वाल्मिक मराठे, शिरीष डहाळे, अशोक इसे, गायत्री ताई, सैंदाने, संदीप पाटील, जितेंद्र बोरसे, विठ्ठल पाटील, गणेश बोढरे, रमेश पाटील, डी पाटील, नामदेव महारु पाटील, गुलाब पाटील, योगेश पाटील, योगेश बाग, यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like