जळगावमध्ये लागू झाले जमावबंदी कलम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ |  जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी माहिती दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत जमावबंदी मुंबई पोलिस अधिनियम कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी घातली आहे. तसेच पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जमावबंदी चा आदेश प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही, हा लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध आणि अपंग इसमांना लागू होत नाही. असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like