जळगावात आढळले बिबट्याच्या दोन बछडयाचें मृतदेह
खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात बिबट्याच्या दाेन बछड्यांचाही मृत्यू झाला असून कुजलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले आहेत. कुजलेल्या अवस्थेमुळे शेतकऱ्यांना दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व घटनेची माहिती वन विभागाला दिली.
वडगाव लांबे शिवारातील प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या चाळीसगाव-धुळे महामार्गालगत असलेल्या शेतात ऊसतोड सुरू असताना ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसून आले होते. त्यानंतर मादी बिबट्या ‘त्या’ बछड्यांना घेऊन गेल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. तेव्हापासून या तिघांचा या परिसरात वावर असल्याने वन विभागाने सावधानतेचा इशारा दिला होता. महिन्याभरापूर्वी या बछड्यांची आई मादी बिबट्या याच परिसरात विहिरीत मृत स्थितीत आढळली हाेती. एकटेपणा आईला पारखे झालेल्या या बछड्यांचा वावर परिसरात होता.
प्रकाश पाटील यांच्या शेत बांधावर झुडपात बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. तीन महिन्याचे व असलेले एक मादी व एक नर असे हे बछडे होते. अद्याप या बछड्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. अंदाजावरून तरी उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला असावा. शवविच्छेदनानंतरच येथील वन कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप भट यांनी शवविच्छेदन केले. यावेळी सहाय्यक वन संरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व कर्मचारी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम