अत्याचाराच्या संशयावरून इसमाला नागरिकांनी चांगलाच चोपला

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | जळगाव येथील शिरसोली प्रार्थनास्थळात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. संशयावरून एका व्यक्तीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
अल्पवयीन मुलीने घडलेल्या घटना घरी सांगितली व ‘त्या’ व्यक्तीची माहिती दिल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर रात्री येथे त्या व्यक्तीला नातेवाइक आणि इतर नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. रात्री घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
वेळीच पोलीसपाटील शरद पाटील यांनी मोठ्या जिकिरीने त्या व्यक्तीला जमावातून कसेबसे वाचवून औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम