रावेर तालुक्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | रावेर तालुक्यातील खेडे भागातील जि.प मराठी शाळा बंद पडत असल्याच चित्र दिसून आले. कोरोनामुळे दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण बंद असलेल्या प्राथमिक शाळा अलिकडेच सुरु झाल्या आहेत. परंतु योग्य तेवढी विद्यार्थी संख्या उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. राज्य शासन मराठी संवर्धनासाठी नवनविन धोरणे प्रकल्प आखत आहे.
तालुक्यातील खिर्डी’सह परिसरात वघाडी, रेंभोटा, भामलवाडी, पुरी गोलवाडा यांसारख्या खेडे गावातील कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये जि.प मराठी शाळा बंद पडलेल्या असून विद्यार्थी संख्या पाच टक्क्यांवर आली आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दुकानावरील मराठी पाट्या सक्तीचे करण्याबरोबर मराठी शाळा ही सक्तीने कराव्यात. मात्र बालभारतीच्या व राज्यातील जि.प. मराठी शाळांकडे कोणतेही शैक्षणिक दृष्ट्या विकासात्मक धोरण नसल्यामुळे जि.प.शाळांवर ही वेळ येत असावी का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावा-गावात गोरगरीब जनतेला मराठी शाळा हीतासाठी सक्तीने सुरू करण्यात यावी अशी मागणी ही ग्रामस्थांकडून होत आहे. पालकवर्ग जवळ असलेल्या सावदा, रावेर, फैजपूर या शहरी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ऐकीकडे राज्य शासन मराठी संवर्धनासाठी नव नविन धोरणे प्रकल्प आखत आहे. तरी देखील शाळांतील विद्यार्थी बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम