महिलेचा मोबाईल लांबविला ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान चौकातील निलकमल हॉस्पीटल येथे महिलेचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनीता सुरेश मोरे (वय-६०) रा. कांचन नगर, जळगाव या महिला पंचमुखी हनुमान चौकातील नीलकमल हॉस्पिटल येथे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात एक जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन महिन्याच्या दरम्यान ड्युटीवर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी मोबाईलचा सर्व शोध घेतला, परंतु मोबाईल कुठेही मिळून आला नाही. अखेर बुधवारी ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंढे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम