वाघळूद खुर्द शिवारातुन पाण्याचो मोटार लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद खुर्द शिवारातील शेतातून शेतकऱ्याच्या विहिरीतील १५ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश दौलत पाटील (वय-६२) रा. वाघळूद खुर्द ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाघळूद खुर्द शिवारात शेत गट नंबर २१ मध्ये त्यांचे मालकीचे शेत आहे. या शेतात विहीर असून शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर एम.टेक. कंपनीची ३ एचपीची मोटार बसवलेली आहे. २ ते ३ जानेवारी दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी सुरेश पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु पाण्याची मोटर संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like