जाणून घ्या आजचे सोने-चांदीचा भाव
खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर मात्र दरात वाढ झाली. भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात तेजी पाहायला मिळाली.
या तेजीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच आज सोमवारी सोने दर 48 हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भावही आज वधारला आहे. चांदीच्या किंमती 1.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड 61,521 रुपये इतका आहे. सोन्याचा दर – मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एप्रिल डिलीव्हरी गोल्डचा दर 0.19 टक्के वाढीसह 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव – चांदीचा भाव आज वधारला आहे. एक किलो चांदीचा दर 1.11 टक्क्यांनी वधारला.
आज जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,970 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा 62,160 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,100 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचा दर किती बदलला
31 जानेवारी 2022- 47,834 रुपये प्रति 10 ग्रॅम
फेब्रुवारी 1, 2022- रुपये 48,254 प्रति 10 ग्रॅम
2 फेब्रुवारी, 2022- रुपये 48,085 प्रति 10 ग्रॅम
3 फेब्रुवारी, 2022, 48,917 रुपये प्रति 10 ग्रॅम
4 फेब्रुवारी 2022- 48,273 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
31 जनवरी, 2022- 61,074 रुपये प्रति किलोग्राम
1 फरवरी, 2022- 61,610 रुपये प्रति किलोग्राम
2 फरवरी, 2022- 61,430 रुपये प्रति किलोग्राम
3 फरवरी, 2022- 60,715 रुपये प्रति किलोग्राम
4 फरवरी, 2022- 60,927 रुपये प्रति किलोग्राम
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम