सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ घसरण 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३१० रुपयाची घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढत असलेल्या वाढीमुळे सोन्याच्या तसेच चांदीच्या किमतीत वाढ होत असताना खरेदीदारांसाठी ही घसरण चांगली मानली जात आहे.

व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. सोमवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,७०० रुपये प्रति किलो इतका आहे. घसरणीमुळे सोने खरेदीदारांमध्ये काहीसा उत्साह दिसून येत आहे.आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती वारंवार बदलत असतात.

गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाची सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दीही दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर होतोच आहे. परंतु, या युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसतायत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like