वडीलांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्णालयात उपचारासाठी भेट
खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | जळगावात दिवंगत सुखलाल चैतराम विश्वकर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी महत्वाचे साधन म्हणून व्हीलचेअर भेट देण्यात आली. स्मृतिदिनानिमित्त वायफळ खर्च करण्यापेक्षा भेट वस्तू देऊन रुग्णालयात मदतीचा हात पुढे केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशालेचे प्राध्यापक डॉ. के. एस. विश्वकर्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी त्यांचे वडील सुखराम विश्वकर्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधायक उपक्रम करण्याचे ठरवले.
सोमवारी २८ मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, प्रशासन अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत व्हीलचेअर रुग्णालयासाठी भेट दिली. यावेळी जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. संजय गायकवाड हजर होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम