झडती घेण्याचा बहाणा करत हिसकावून घेतले सहा हजार रूपये आणि मोबाईल
खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | भडगाव रोडवर झाडती घेण्याच्या बहाणा करून अज्ञात दोन जणांनी तरूणाला धमकी देत खिश्यातील महागडा मोबाईल आणि रोकड जबरी लांबविल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल झालाय.
अभिलाष रमेश येवले वय-२८ रा. भडगाव रोड, पाचोरा हा तरूण खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २८ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाचोरा जाण्यासाठी अभिलाष हा शिरसोली नाक्यावरील नुक्कड वडापाव दुकानासमोर उभे होते. अचानक त्यावेळी दुचाकीवर अज्ञात दोन जण आले. त्यांनी झडती घेण्याच्या बहाणा करून अभिलाष येवले यांच्या खिश्यातील ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि ६ हजाराची रोकड जबरी हिसकावून लांबविली.
तसेच कुणाला काही सांगितले तर मारून टाकू अशी धमकी दिली. या संदर्भात अभिलाष येवले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २८ मार्च रोजी रात्री दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरासे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम