पेट्रोलचे डिझेलच्या दरात तब्बल सहा वेळा वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील चार महागरांसह इतर शहरात प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेल दर वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२१ पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती.

आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. या दर वाढीमुळे देशभरातील मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मंगळवारी पेट्रोल दर ८०-८५ पैसे प्रति लीटर आणि डिझेल ७०-७५ पैसे प्रति लीटरने महागलं आहे.मागील जवळपास आठ दिवसांत इंधन दर ४ रुपयांहून अधिक वाढला आहे.

देशात तब्बल साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी सात दिवसात सहा वेळेस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात पेट्रोलचे भाव ४.८० रूपयांनी वधारले आहेत. आज सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी ११५.०४ रूपये तर डिझेलसाठी ९९.२५ रूपये मोजावे लागणार आहेत. तर राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी १००.२१ रूपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी ९१.४१ रूपये मोजावे लागणार आहेत.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like