सोने- चांदीच्या भावात लवकरच होणार घसरण, तात्काळ खरेदी करा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतारादरम्यान सोमवारी भारतीय बाजारात सोने-चांदी दरात बदल झाले आहेत. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेलं युद्ध संपल्यानंतर सोने दरात घसरण होईल असा बाजार अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिवसभरात यामध्ये आणखीही बदल होऊ शकतो.

आज आठवड्याच्या पहिल्याच जळगाव सराफ बाजारात दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.आज ५३,३०० इतका आहे.सोमवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,०९० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,४५० रुपये प्रति किलो इतका आहे.

गेल्या आठवड्यात सोने भावात जवळपास ४५० ते ५०० रुपयाची वाढ दिसून आली तर चांदीच्या दरात ९०० ते ९५० रुपयांची वाढ झालेली दिसून आलीय. जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७०, २३ मार्च रोजी ५२,५८०, २४ मार्च ५२,९८० तर आज ५३,३०० इतका आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,५९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,३०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,२५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,६४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८९ रुपये आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like