चार दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या ७ दिवसांबद्दल बोलायचे झाले तर ६ वेळा वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ४.१० पैशांनी वाढल्या आहेत. पेट्रोल ३० तर डिझेल ३५ पैशांनी महागलं आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत.
तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरुच असून आज सोमवार २८ मार्च रोजी पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागलं आहे.जळगाव जिल्ह्यात काल डिझेल ९७.६७ तर पेट्रोल ११४.९१ रुपयांनी विकलं जात होतं. तर आज ३० ते ३५ पैशांची वाढ झाल्यानं डिझेल ९८.०३ रुपये तर पेट्रोल ११५.२२ रुपयांनी विक्री होते.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे.देशात इंधन दरवाढीचा भडका सातत्याने उडत असून गेल्या सहा दिवसांत पाचवेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबई मध्ये पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागल आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर ११४.१९ रुपये तर डिझेलचा दर ९८.५० रुपये इतका आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम