धरणगाव शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला संतप्त शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

धरणगाव येथील हेमंत द्वितीये एका व्यक्तीने सोशल मीडियावरील जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. .

हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी ते पत्नी, मुलगी आणि सासऱ्यांसह जळगावातील आयनॉक्स चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. शिवसैनिकांनी त्याच्यावर पाळत ठेवत थिएटरसमोर त्यास बेदम मारहाण करत पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला. शहर पोलीस ठाण्यात हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत द्वितीये सांगितले, मी कोणतीही पोस्ट टाकली नसताना देखील त्यांनी आरोप घेऊन मारहाण केली. माझी पत्नी गौरी ही सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र पडून नुकसान झाले आहे. तसेच तिच्या हाताला देखील मार लागला आहे. मला झालेल्या मारहाणीत माझ्या नाकातून रक्त येऊ लागले. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो” असं वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. सर्वांनी मला जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याने हेमंतने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

शहर पोलिसात मारहाण आणि धमकी दिल्याने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like