अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगाव पहूर येथील जामनेर रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल स्वारकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याचा अपघात घडला आहे. अनेक वेळा मोठमोठे अपघात घडत असतात.

पहूर येथील जामनेर रोड लगत असलेल्या राज्यश्री कोटेक्स जवळ काल रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल क्रमांक एम. एच.०५ सी. डी.४०३२ वरील मोटारसायकल स्वार ज्ञानेश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सरला या गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पहूर येथील अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मयताच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. अपघातात गंभीर जखमी असलेल्या सरला सोनवणे यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या. याबाबत रात्री उशीरापर्यंत पहूर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like