नागरिकांची गैरसोय, एटीएम करता उनहात भटकंती
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगावात सलग सुट्यांमुळे शहरासह जिल्हाभरातील सर्वच एटीएम मध्ये चलनी नोटांचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खडक उन्हात पायपीट करत एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमसाठी भटकंती करावी लागत आहे. बँक कर्मचाऱ्यानी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून दोन दिवसीय संप पुकारला आहे.
आर्थिक वर्ष मार्चअखेर सर्वच बँक, सोसायट्या, पतपेढ्या, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था त्यांचे आर्थिक व्यवहार ताळेबंद पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. त्यातच राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरण विरोधात सर्वच बँक कर्मचाऱ्यानी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून दोन दिवसीय संप पुकारला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी येणी असलेल्या रकमांचे कर्ज खाते बेबाकी करण्यासाठी लक्षाधीशांपासून ते सर्वसामान्य नागरिकांना घाई झालेली आहे.
गेल्या सप्ताहात चौथा शनिवार आणि रविवार सलग सुट्यामुळे बहुतांश बँकांच्या एटीएम मध्ये चलनी रकमेचा भरणा झाला नाही. त्यामुळे शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी बँकांच्या एटीएम मध्ये चलनी नोटांचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पैसे काढण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना आर्धिक देवाण-घेवाण करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम