जळगावमध्ये इकरा एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थीचा गौरव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | जळगाव येथील इकरा उर्दू ज्युनियर कॉलेज मध्ये 5 रोजी D.L.ED. च्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात लक्षणीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या अध्यक्षते खाली खान जवेरिया युसूफ यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्या सईदा वकील मॅडम यांनी परीक्षेच्या निकालाची माहिती दिली. विशेष अतिथी अब्दुल रशीद शेख, चेअरमन डी.एल.एड कॉलेज, एस.एम.जफर, चेअरमन इकरा उर्दू हायस्कूल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की, शिक्षकांनी आपल्या पदाचे पावित्र्य राखून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रफिक यांनी केले. तर वसीम अख्तर यांनी आभार मानले.

शेख नबिला मुख्तार 94.35 प्रथम, शेख इरम अफजल 93.10 द्वितीय, काझी महेवश फातिमा मुजम्मिलोद्दीन 92.95 तृतीय, प्रथम वर्षा मध्ये शेख शाइमा मरियम उस्मान 88.50% प्रथम, बुशरा परवीन हारून रशीद 87.60% द्वितीय, उंबरीन शेख सलीम 85.30 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like