धानोऱ्यात रस्त्यावरील पेव्हरब्लॉक खचल्याने ग्रामस्थत संतप्त
खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | जळगाव मधील धानोऱ्यात येथील मुख्य रत्यांवर तसेस गावातील बहुतांशी गल्ली बोळांमध्ये आमदार निधी, जि.प.निधी, पं.स.निधी, ग्रामपंचायत यामधून ज्या त्या लोकप्रतिनिधींनी विकासकामे करत . फेव्हरब्लॉक बसवली परंतु आता हे फेव्हरब्लॉक जमिनीत खचत असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
ग्रामपंचायतप्रती ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गावात ठिकठिकाणी फेव्हरब्लॉक बसविण्यात आले असून अनेक ठिकाणी हे फेव्हरब्लॉक उखडायला लागले आहेत. तसेच गावात काही ठिकाणी बांथकाम सुरू असून याठिकाणी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे देखील हे ब्लॉक्स जमिनीत खचत आहेत. यामुळे रस्त्यावर चालतांना वृद्धांचा किंवा लहान मुलांना फेव्हरब्लॉक वर पडलेल्या खड्ड्यात पाय जाऊन दुखापत होत आहे.
आमदार, जि.प., पं.स. सदस्य, यांनी आपल्या निधीतून धानोरा येथे मुख्य रस्त्यावर तसेच गावातील अनेक ठिकाणी फेव्हरब्लॉक बसविले आहेत. परंतु आता जमीनीत उंदीर व घुसांमुळे बीळ तयार झाल्यामुळे यावरून एखादे अवजड वाहन गेल्यास हे फेव्हरब्लॉक खाली खचून रस्ता खालीवर होत आहे. तर नवीन नळ कनेक्शन साठी खोदकाम केल्यानंतर फेव्हरब्लॉक तुटलेल्या अवस्थेत तसेच सोडून दिले जात आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन खचलेल्या फेव्हरब्लॉकच्या जागी सिमेंट काँक्रीटचा भराव करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम