जळगाव घरकुल हस्तांतरणाचा प्रश्न ऐरणीवर
खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | जळगाव शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे निवासस्थान असलेल्या हुडको भागातील दोन गाळ्यांबाबत महापालिकेने त्यांना एक नोटीस बजावली आहे. जळगाव व.वा.(गोलाणी) मार्केट मधील बहुसंख्य दुकाने 90 % अशीच हस्तांतरीत झाली आहेत. सुमारे विस वर्षापुर्वी कुणी तेव्हाच्या किमतीत हे व्यापारी गाळे घेत नव्हते. सन 2009 च्या ठरावाप्रमाणे एक हजार रुपये हस्तांतर शुल्क आकारुन ते घरकुल नव्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरीत करावे असा सोपा मार्ग दिसतो.
गुप्ताजी यांनी महापालिकेच्या लेख्यात बेकायदेशीररित्या ती निवासासाठी ही घरे दुस-याच व्यक्तीच्या नावे असून वापरली. त्यावर सात दिवसात मनपाने उत्तराची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापी लागलीच गुप्ताजी यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात सन 2009 च्या एका ठरावात एखाद्या व्यक्तीचे घरकुल हस्तांतर करायचे झाल्यास रु.1000/-(रु. एक हजार मात्र) हस्तांतर शुल्क आकारण्याची तरतुद असल्याचे गुप्ताजींचे म्हणणे आहे.
जळगाव नपाच्या कथित घरकुल योजनेत अनेकांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचे भाडे रितसर वसुल केले तर मनपास सुमारे 15 कोटी मिळू शकतात असे सांगितले जाते. परंतु बरीच मंडळी हे भाडे भरत नाहीत किंवा त्यांनी ती घरकुले एक तर काही रक्कम घेऊन हस्तांतरीत केली किंवा भाड्याने इतरांना दिली असावी असे म्हटले जाते. घरकुलाच्या बाबतीत देखील तसेच मनपा ठरावाप्रमाणे हस्तांतर शुल्क आकारुन महसुल वाढवण्याचा मार्ग मनपाने स्विकारावा असे सुचवावेसे वाटते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम