कायदा व सुव्यवस्थेसाठी एसपीचे ‘ऑलआऊट ऑपरेशन’

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यातर्फे अचानक ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबवण्यात आले. ‘ऑलआऊट’ दरम्यान काहींना अटक झाली तर, काही कारागृहात रवाना केले गेले.

शनिवारी मध्यरात्री अचानक ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. वाहन तपासणी, मद्यप्राशन करून गाड्या चालवणाऱ्यांवरही रविवारी पहाटेपर्यंत कारवाई सुरू होती. रेकॉर्डवरील गुन्हेगार, जामिनावर मुक्त, वॉरंट बजाविलेल्यांची चौकशी करून संशयितांवर कारवाईसाठी संपूर्ण पोलिस सदल रस्त्यावर उतरले होते.

डॉ. प्रवीण मुंढेसह निरीक्षक कुंभार (तालुका), निरीक्षक प्रताप शिकारे (एमआयडीसी), निरीक्षक विजय ठाकूरवाड (शहर), निरीक्षक बळीराम हिरे (शहर), रामदास वाकोडे (जिल्‍हापेठ) व निरीक्षक विकास शिंदे (रामानंद) यांच्यासह गुन्हेशोध पथकाचे कर्मचाऱ्यांसह कोम्बिंग ऑपरेशन राबवीत नाकाबंदी करुण वाहनांसह, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यात अजामीनपात्र संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like