सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे या व्यापारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. या व्यापारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याबरोबरच चांदीही महाग झाली. रशिया युक्रेन युद्धामुळे या महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल दिसून आला.

गेल्या ३६ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार. आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,१५० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,९९० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,६४० रुपये आहे. २८ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ५१,४०० रुपये प्रति तोळा इतका होता. कोरोना महामारीच्या काळात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये, शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे, सोन्याची मागणी वाढली होती आणि त्याचा दर 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like