जाणून घ्या आजचे सोने चांदीचा आजचा दर

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 200 रुपया पर्यंतची घट दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या भावात 1200 रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन आणि चांदीचे भाव घसरले. लग्नसराईच्या मोसमाने भारतीय सराफा बाजाराची चमक पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात काहीशी नरमाई आली आहे.
आज जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,360 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा 63,490 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते
जळगाव सराफ बाजारात 31 जानेवारी 2022 सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव 48,730 इतका होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या 1 फेब्रुवारी रोजी सोन्यात 70 रुपयाची वाढ होऊन सोने 48,800 प्रति तोळा इतक्यावर गेला होता. तर दुसरीकडे 31 जानेवारीला चांदीचा 62,460 प्रति किलो भाव होता. तो 1 फेब्रुवारीला 62,410 रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम