जळगाव जिल्ह्यातील निवडणूकीत 10 गट व 20 गण वाढणार

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यातील निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात घोषणा केली. गटाचा व गणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात 10 गट व 20 गण वाढणार आहेत. भाजप गेल्या चार पंचवार्षिकपासून जिल्हा परिषदेत सत्तेत आहे.
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. निवडणुका वेळेत होणार असल्याचे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.9 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा सादर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. 20 मार्च रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात येत आहे.
अधिवेशनात गट व गण रचना वाढीच्या मंजूर करण्यात आलेल्या विधेयकावर राज्यपालांची मोहोर उमटल्याने जिल्ह्यात 10 गट व 20 गण वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात जि. प सदस्यांची संख्या आता 67 वरून 77 होणार आहे.जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली .पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार शिवसेनेचे.
बर्याच तालुक्यात गट आणि गणांमध्ये फेरबदल होणार असून, त्यामुळे राजकीय समीकरणे बदलून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे. . त्यात संभाव्य गटवाढीमध्ये चाळीेसगावात दोन, अमळनेर, चोपडा, रावेर, जामनेर, यावल, धरणगाव, पाचोरा येथे प्रत्येकी एक गट वाढण्याची शक्यता असून, 20 गणदेखील वाढणार आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत राजकारण बदलले आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आजवर जिल्हा परिषदेत भाजप नेते गिरीश महाजन व खडसे यांंचा दबदबा राहिला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम