लक्ष्मण हरी बोरोले महाराजाचे निधन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ |  जळगाव जिल्ह्यातील गाडेगाव येथील रहिवासी हभप लक्ष्मण हरी बोरोले महाराज यांचे आज रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले.बातमी पसरताच सकाळपासून भक्तांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

त्याची अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी 5 वाजता राहते घर गाडेगाव येथून निघनार आहे. ते इच्छाराम, भगवान, व योगेश बोरोले यांचे वडील होते.आयुष्यभर अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी आपल्यातला भक्तीभाव जपला आणि त्याची रुजवण भक्तपरिवारामध्ये केली. लहानपणापासून महाराजांना कीर्तनाची फार आवड होती त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने खूप त्रास देखील सहन केला आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आणि आयोजन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभरातील भक्त त्यांच्याकडे येत असत.बाबांची निधन वार्ता समजताच मोठा धक्का बसला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like