महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने लता दिदींच्या आठवणींना उजाळा
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | ज्येष्ठ गायिका व भारतरत्न स्वर्गीय लतादीदींना रायसोनी महाविद्यालयातर्फे सोमवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लतादीदींचे गाण्याच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या महिनाभरापासून लता दीदी रूग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतातील संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. कार्यक्रमासाठी रायसोनी इस्टीट्युटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील व प्रा.राहुल त्रिवेदी यांनी सहकार्य केले. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.
यावेळी संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की, सकाळी उठल्यावर देवाची आरती, मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत गायले. अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला. त्यांच्या सुरांमधून येणाऱ्या आठवणी युगानुयुगे कायम राहतील असे मत व्यक्त केले. लतादिदींच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशात आणि जगात पसरली अन् त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम