राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकाने महिलांच्या विनयभंगचा आरोप शिवसैनिकांवर केला
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांचा अनादर होत असल्याचा आरोप केला आहे परंतु, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील कु-हा बोदवड व सावदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद युवा संवाद सभेचे आयोजन केले होते. शिवसैनिक तसेच आमदारां संदर्भात अपप्रचार व दिशाभूल करणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख तर्फे करण्यात आले.त्याला प्रत्युत्तर म्हणून आज शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, संतोष माळी, दीपक बोदडे, अनास खान, जिवराम कोळी उपस्थित होते.
गेले पंचवीस वर्षे शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीला मदत करण्यात आली. आम्ही आजही विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा व पदाधिकाऱ्यांचा आदर करतो व भविष्यातही करीतच राहणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनी शिवसेनेची छबी खराब करू नये, त्यासोबतच 2024 मध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपमध्ये जातील असा जावई शोध ही मेहबूब शेख यांनी लावला आहे. परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही कालही शिवसेनेत होतो आजही शिवसेनेत आहोत आणि भविष्यातही शिवसेनेतच राहणार आहोत. असे ठामपणे सांगितले.
यावेळी अफसर खान म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेहबूब खान यांनी मुक्ताईनगर येथील आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळाने विजय झालेले आहेत परंतु, आता त्यांची भाषा बदलण्याचा आरोप केला आहे. आम्ही शिवसैनिक महिलांचा आदर करतो. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करणे शिकवू नये, असे शिवसेनातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम