नवनाथ मंदिराची दानपेटी फोडली,चार ठिकाणी डल्ला मारला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे 6 जानेवारी मध्यरात्री चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आनंदराव निकम हे 4 रोजी घराला कुलूप लावून मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी बांभोरी (ता.धरणगाव) येथे गेले होते. तसेच गावातील श्री चैतन्य नवनाथ सिद्धाश्रम मंदिरातही चोरट्यांनी चोरी केली.यात 2 घरे एक वेल्डिंग दुकान व नवनाथ मंदिराची दानपेटी फोडून, एकूण 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. मंदिरातील सीसीटीव्ही चे डीव्हीआर चोरून नेत चोरांनी मंदिराची दानपेटी फोडली. त्यातील 15 हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली.

शेजारील रहिवासी राजू निकम यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासह उषाबाई बाळू पाटील यांचे घर व योगेश विठ्ठल खैरनार यांचे वेल्डिंग दुकान फोडून रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले. याबाबत आनंदराव निकम, दिनेश पाटील यांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. एकाच रात्री गावात चार ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like