मामेभावाने अत्याचार करत व्हिडीओ सोशल मीडियात केला व्हायरल
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | जळगाव जिल्हा पाचोरा तालुक्यातील एका तरुणीला लॉजवर नेऊन, तिच्यासोबत शारीरक संबंध ठेऊन फसवणूक केली. त्या व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये तयार करून तो व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे.
पीडित तरुणीच्या मामेभावाने गोड बोलून कधी तिला घरी नेऊन तर कधी फर्दापूर येथील लॉजवर नेऊन बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फर्दापूर येथील लॉजवर शारीरक संबंध करतानाचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये तयार केला. एवढेच नव्हे तर, तो व्हीडिओ सर्व मित्र परिवाराच्या व्हाट्अॅप ग्रुपवर व्हायरल केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फिर्यादी महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गोष्टीची चर्चा होऊ लागताच पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मामेभावाच्या आई-वडिलांकडे या सगळ्याचा जाब विचारला. त्यावर त्यांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील 61 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मणराव नजन पाटील हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम