एरंडोलात मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ |  भारतात दरवर्षी कॅन्सरच्या एक लाखांच्या वर केसेस नोंदवल्या जातात. त्यापैकी सुमारे 50000 महिला मृत्युमुखी पडत असल्याचा सरकारचा आकडा आहे. एरंडोल येथे राजस्थानी महिला मंडळ व लायन्स क्लब जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जळगाव येथील कॅन्सर तज्ञ डॉ. नीलेश चांडक व त्यांचे सहकारी तज्ञ यांनी कॅन्सर विषयी शिबिरात तपासणी व मार्गदर्शन केले गेले.स्तनाची त्वचा राठ होणं, स्तनावर खळी सदृश्य खाच दिसणं, स्तनाग्राभोवतीची त्वचा तडकणं, स्तनाग्रातून स्त्राव होणं, खाज येणं किंवा वेदना होणं अशी काही लक्षणं जाणवत असतील, तर तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

प्रामुख्याने स्तन कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. यात शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. एरंडोल येथील डॉ. उज्वला राठी, डॉ. राखी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त राजस्थानी महिला मंडळ यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं कशी ओळखायची? लक्षणं लवकर लक्षात आली तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like