राज्यात मिश्र वातावरण, दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्रीची थंडी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ |  राज्यातील काही भागात थंडी ओसरत असल्याचं समोर येत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागात या वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली हाेती. ही लाट हळूहळू ओसरत असून, तापमान वाढत आहे. साेमवारी कमाल तापमान 31.8 अंशांवर गेले हाेते.

तापमान वाढल्याने दिवसभर उन्हाचा चटका वाढला हाेता. या आठवड्यात तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. सध्या सकाळी थंडीचा कडाका जाणवतो तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्रीची थंडी असं मिश्र वातावरण राज्यात पाहायला मिळतंय. रात्रीचे तापमान हळूहळू 15 अंशांकडे झेपावत आहे. साेमवारी किमान तापमान 9.7 अंशांवर हाेते. त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत हवामान काेरडे आणि निरभ्र राहील, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मराठवाडा आणि विदर्भात हळूहळू दिवस मोठा होत असून दिवसा तापमान वाढलं आहे. पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तरेतील राज्यावर हाेत असून, सध्या तरी महाराष्ट्राच्या दिशेने येणारे गार वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली असून, वेगही कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून थंडीची लाट ओसरली आहे.तर काही ठिकाणी गारपिटींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात गारठा कमी होत उन्हाचे चटके अधिक जाणवू शकतात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like