रूपाली चाकणकरानी कबुली, राज्यातील बालविवाहाच्या घटना वाढल्या
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले असून एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या काळात तरुणींचे तेराव्या व चौदाव्या वर्षी लग्न लावून दिले आहे. अनेक ठिकाणी तरुणींचे वय वाढीव दाखविली असल्याची कबुली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाला समुपदेशन करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण बीड, औरंगाबाद, अहमदनगर, परभणी, सोलापूर , जालना, बुलढाणा या जिल्ह्यांत आहे. गेल्या दोन वर्षात एकूण ९१४ बालविवाहच्या घटना रोखण्यात आल्या आहेत. यातील ८१ घटनांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सध्या सरकारकडे नोंद झालेली आकडेवारी आहे. पण नोंद न झालेली आकडेवारी फारच मोठी आहे. वयाच्या १४ – १५ व्या वर्षीचा बाल विवाह केला जातो. विवाहानंतर एका वर्षातच संबंधित अल्पवयीन मुलावर बाळंतपण लादले जाते. अनेकदा या बाळंतपणात माते व बालकाचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढले आहे. यावर आळा घालणे आवश्यक आहे.असे त्यांनी याआधी सांगीतले होते.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या मंगळवारी जिल्ह्यात आल्या होत्या. त्या म्हणाल्या की, कोरोनामुळे अनेक मुलांना पालक गमाविले आहेत. त्यांना आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी ‘मिशन वात्सल्या’ योजना राबविली आहे. यामध्ये ६० हजार लाभार्थी असून ज्यांनी पालक गमविले आहे त्यांना मदत दिली जात आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम