खान्देशात पिकाला आणि शेतमालाला चांगले दर
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यात तापी, गिरणा नदीच्या लाभक्षेत्रात पिकाची कापणीदेखील झाली आहे. खानदेशात हरभरा पीक मळणीवर येत आहे. आगाप किंवा ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले पीक बऱ्यापैकी पक्व झाले आहे.
काळ्या कसदार जमिनीत जळगाव तालुक्यात आसोदा, ममुराबाद, कानळदा शिवारातील हरभरा पीक जोमात असून, काही शेतकऱ्यांच्या पिकाची कापणी झाली आहे. या पिकाला किंवा शेतमालास चांगले दरही मिळतील, अशी अपेक्षा आहे.
हरभरा पीक खानदेशात हुकमी पीक आहे. यामुळे त्यातून रब्बी हंगामातील नुकसानीची भर काढण्याचा प्रयत्नही शेतकरी करतात. यंदा खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी केली जाते. हरभरा पीक खानदेशात सर्वाधिक घेतले जाते.
15 ऑक्टोबर ते 8-10 डिसेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ऑक्टोबरच्या मध्यात पेरणी केलेले हरभरा पीक मळणीवर आले आहे. पीक पक्व झाले असून, त्याचे उत्पादनही चांगले येईल, अशी स्थिती आहे.
देशी व विद्यापीठांकडून संशोधित वाणांची पेरणी कमाल शेतकऱ्यांनी केली होती. तसेच खासगी कंपन्यांचे वाण, काबुली हरभऱ्याचीदेखील कृत्रीम जलसाठाधारकांनी पेरणी केली होती. अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळू शकते. कापणी, पीक एका जागेवर गोळा करणे आदी कामांसाठी एकरी अडीच ते तीन हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येत आहे. तर मळणीसाठी एका क्विंटलला 200 रुपये खर्च येत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम