राज्यातील ढगाळ वातावरण तर शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढता आहे. जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर पासूनच दिवसाच्या तापमानात वाढ झाली. दिवसेंदिवस उष्णतेत एक ते दोन अंश वाढ होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून जिल्हा परिसरात ढगाळ वातावरणामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपात तुरळक सरींसह पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी ११ च्या दरम्यान तापमानाचा पार ३५ अंशावर असून किमान २३ अंश तर हवेतील आर्द्रता ३० टक्के असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील ढगाळ वातावरणामुळे उष्मा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र वातावरणात फारसा बदल तरी झालेला नाही.

जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढता आहे. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा चढता असल्याचे जाणवून येत असतानाच वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या पूर्व भागात फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव आदी प्ररीसरात तीन ते पाच मी.मी. तर भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि जळगाव या तालुक्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मध्यम हलक्या पावसाची शक्यता आहे.

महराष्ट्रात देखील 7 ते 9 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात हरभरा, गहू काढणी चालू आहे. 7 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी हरभरा, गहू काढूण घेणे गरजेचे आहे. कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like