पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर
खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | पुणे जिल्ह्यात अमळनेर शहरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आला याबाबत एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा अनेक घटना नेहमीच घडत असतात.
पुणे जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते.
याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करीत आहे. या प्रकाराबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या कारवाईबाबच माहिती दिली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम