कारच्या धडकेत तरुणाचा अपघातात मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ | लग्नातील हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी पाळधी येथे गेलेल्या तरुणाचा भरधाव कारच्या धडकेत तरूणांचा जागीच मृत्यू . जळगाव येथे द्वारका नगर, गणेश सुखदेव महाजन वय 30 याचं मयत झाल आहे.

रविवारी हि दुःख घटना घडली. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार यांच्यासोबत पाळधी येथे हॉटेलात जेवणासाठी थांबले होते.

पाळधी येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर गणेश हा त्याच्या मित्रासह पुढे द्वारकानगर कडे रवाना झाले. हॉटेलपासून काही अंतरावर मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला मित्र जखमी झाला. कारचालक कार सोडून पसार झाला. परिसरात लोकं जमा झाल्याने विचारपूस केली असता तपास दरम्यान घटनास्थवरून कारचालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

दुसरे तिसरे कोणी नसून लहान भावाचा अपघात झाल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गणेशच्‍या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणेशच्‍या पश्‍चात आई- वडील, पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ वहिनी असा परिवार आहे. पाळधी पोलीसांनी कार जप्त केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like