कासोदा तरूणांची एस एस आर पदासाठी निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ |    इंडियन नेव्ही मध्ये एस.एस.आर तालुक्यातील कासोदा येथील प्रवीण शिंपी या पोस्टमध्ये निवड झाली आहे. 6 महिन्याची ट्रेनिंग पूर्ण केले. येथील गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने जुने पोलीस स्टेशन आवारात सत्कार करण्यात आला.

अक्षय घरी आला असल्याचे कळल्याने, त्याचे व त्याच्या आई वडिलांचे कासोद्यातील जुने पोलिस स्टेशन आवारात गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम भारतरत्न गाणकोकिळा लता मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून, मधुकर समदानी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

अक्षय याने वयाच्या 18 वर्षी शिक्षण करीत असताना गरुड झेप घेऊन इंडियन नेव्ही मध्ये एस.एस.आर या पदांवर यशाचे शिखर गाठत आपला ठसा उमटविला. आपल्या धकाधकीच्या जिवनात रात्रंदिवस मेहनत करून आपल्या गरिबीची उणीव मुलगा अक्षय व मुलगी मयुरी (इ.१२ विज्ञान) यांना येऊ दिली नाही. अक्षयचे वडिल प्रविण शिंपी हे पेशाने ड्रायव्हर असून गाडी चालवून व आई नयना शिंपी ह्या एका पायाने अपंग असून त्या दररोज शिलई मशिन चालवत आहे.

अक्षय याने आपल्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत दहावीच्या वर्गात 91 % गुण मळविले व 12 वि विज्ञान शाखेमध्ये 81 % गुण मिळून त्याने एम.जे.कॉलेज येथे पुढील शिक्षण घेत असतांना इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेड मध्ये बहुमान मिळाला. त्यात अक्षयलाही या राजपथावर परेड करण्याचा मान मिळाला असता या परेड मध्ये तिन्ही दलाच्या जवानांनी परेड केली.त्यात अक्षयचे 2500 जागेवर 10 हजार मुलांमध्ये सिलेक्शन झाले. त्याची ऑगस्ट 2021 मध्ये उडीसा चिलखा येथील ट्रेंगीन सेंटर मध्ये 6 महिन्याची ट्रेनिंग सुरू असतांना अक्षयची 2500 मुलांमध्ये 170 मुलांची निवड होऊन. तब्बल 9 वर्षा नंतर इंडियन नेव्ही ला प्रथम पारितोषिक मिळाले.

या प्रसंगी पांडुरंग वाणी, मधुकर समदानी, राजा मंत्री पतसंस्थेचे चेअरमन किशोर मंत्री, संजय चौधरी, नरेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य नरेश ठाकरे, बंटी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बियाणी, हरिष पटेल, बस स्थानक प्रमुख गोविंद बागुल, डॉ.अजय सोनी, सुनील समदानी, ऍड. अशोक पाटील, ऍड. जयेश पिलोरे, राजेंद्र वाणी नगावकर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like