टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातला जाणार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून काही प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या बडोदा येथे हलवण्यात आला आहे.

अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like