जामठी येथे ५ दुकाने फोडली ; हजारोंचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | येथील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी फोडून हजारोंचा मुद्देमालासह रोकडही लंपास केल्याची घटना बोदवड तालुक्यातील जामठी येथे उघडकीस आल्यानंतर उडाली असून चोरट्यांनी या पाचही दुकानातून सुमारे ७२ हजाराची चोरी केली असल्याचे समोर आले आहे.
या ठिकाणी झाल्या चोऱ्या !
शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी बस स्थानकावरील पाच दुकाने फोडीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यात बस थांब्या जवळील अमोल प्रोव्हीजन या किराणा दुकानातील १४ हजार रुपये रोख रक्कम तथा ५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर व सुकामेवा चोरट्यांनी लंपास केलेला असल्याची माहिती किराणा दुकान मालक काशिनाथ गुलाबचंद तेली यांनी दिली. . तर या दुकानासमोर असलेल्या महाजन कृषी केंद्र येथील २१ हजार ६००रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे कुणाल भगवान महाजन यांनी सांगितले. . साई राणा कृषी केंद्रातील सुमारे ५ हजार रुपये रोखआणि पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याची कृषी केंद्र चालक सुरेंद्र पाटील यांनी फिर्यादीमध्ये माहिती दिलेली आहे. तसेच ग्राहक सेवा केंद्र मधील संदीप विठ्ठल महाजन यांच्या मालकीच्या दुकानातून ८ हजार रुपये रोख रक्कम व ५ हजार रक्कमेचा सीसीटीव्हीटी डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला आहे. येथीलच सद्गुरू जनरल स्टोअर मधील चोरट्यांनी २ हजार५०० रुपये रोख आणि ७ हजार ५०० रुपये किमतीच्या वायर तथा कास्मेटिक पावडर व इतर साहित्य चोरट्याने लंपास केलेले आहे.

चोरीच्या घटना या रेकॉर्ड होऊ नये याकरता चोरट्यांनी सर्व ठिकाणच्या डीव्हीआर चोरी करून नेल्या आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी पाहणी केली .जळगाव येथील श्वान पथकाला ही प्राचारण करण्यात आले होते. जंजीर नावाच्या श्वानाने प्रत्येक दुकानात जाऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांच्या विरोधातगुन्हा दाखल करण्यात आलेला .असून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सुधाकर शेजोळे तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like